0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पालघर |
देवा ग्रुप फाउंडेशन तर्फे कै.उल्हास भोईर आश्रम शाळा तालुका विक्रमगड जिल्हा पालघर या शाळेला विनामूल्य सोलर पॅनल दिली भेट मागील अनेक वर्षापासून देवा ग्रुप फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, कला ,क्रीडा ,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे त्याचे एक उत्तम उदाहरण अतिशय थाटात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला अण्णासाहेब जाधव संस्थेचे संस्थाध्यक्ष विजय जाधव,तसेच कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,विक्रमगड तालुक्यातील तहसीलदार, देवा ग्रुप फाउंडेशन चे सचिव तानाजी मोरे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश बंटी पाटील ,देवा ग्रुप फाउंडेशन मुंबई अध्यक्ष आरती चीतले,मुंबई हायकोर्टाचे Ad.भोजने,सुनील गोरे कार्याध्यक्ष देवा ग्रुप फाउंडेशन, विक्रमगड तालुका अध्यक्ष गिरीश बांगर,मनसेचे वाडा तालुका सरचिटणीस मनोज चौधरी, डॉ. भाई वलटे ,प्रविण सोनावणे, रूपेश निपुर्ते, मनोज पाटील सतुश देसले व शाळेचे मुख्याध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते 
त्यादरम्यान विश्वनाथ पाटील यांनी भाषणात सांगितले की ही तर स्वयंघोषित नेत्यांन सारखे बॅनरबाजी न करता खरी गोरगरीब समाजासाठी सेवा करणारा हा देवा ग्रुप फाउंडेशन काम करते विक्रमगड तालुक्यात आपल्या मार्फत हा लाखो रुपयांचा सोलर पॅनल आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल विश्वनाथ पाटील साहेबांनी त्यांचे मनापासून आभार मानले व धन्यवाद दिले.
संस्था आध्यक्षनी सांगितले की आज पर्यंत आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणी मदत केली नाही म्हणून देवा ग्रुप फाउंडेशन चे आम्ही कायम ऋणी राहू आपल्या माध्यमातून आमच्या शाळेतील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना गरम पाण्याची व लाईटचे आपल्या मार्फत व्यवस्था झाली त्याच्याबद्दल त्यांनी आभार मानले.

Post a comment

 
Top