0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीचा पार्श्वभुमिवर मनसेची एक बैठक आज कृष्ण कुंज वर होणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार असल्याचं बोललं जातं आहे. अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरूवात होणार आहे. या बैठकीत औरंगाबादचे मनसे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होणार आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी औरंगाबाद मध्ये आले होते. महानगरपालिका निवडणुकीत मनसे आपल्या पुर्णत:हा तयारीत उतरणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे या बैठकीत नेमक्या काय सुचना मनसे सैनिकांना देणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Post a comment

 
Top