web-ads-yml-750x100

Breaking News

मुरबाड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची शेकडो बोगस कामे;कामे कागदावरच अधिकार्‍यानी काढली खोटी बिले

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देयक तपासणीक उपअभियंता शाखा अभियंता ठेकेदार यांनी सन 2016 19 कालावधीत झालेल्या टेंडरची कामे न करताच बिले काढली असुन टक्केवारीने शासनाचा निधी हाडप करण्याचे काम संबधित अधिकार्‍यांनी केला आहे.रस्ते इमारती दुरूस्ती पर्यटन 25/ 15 डोगरी विकास आदिवासी विकास अशा अनेक हेडमधुन कामे मंजूर करून कामे न करताच बिले काढली आहेत.अनेक कामे अपुर्ण आहेत त्यांना टक्केवारी घेवुन बिले देण्यात आली मात्र ज्यांनी टेंडर मधील कामे करून वाढीव कामे केली अधिकार्‍यांनी करून घेतली त्यांना बिले देण्यास पैशाची मागणी केली जात आहे.या भ्रष्टाचाराला सत्ताधारी पाठिशी घालत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मांगणी जेष्ठ प्रकार नामदेव शेलार यांनी पंतप्रधान राष्ट्रपती यांच्याकडे केली होती पंतप्रधान कार्यालयातुन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यसचिवाना कारवार्इचे आदेश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र राज्याचे सचिव यांनी संबधित ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतासह संबधितावर शिस्तभंगाची कारवार्इ करून आहवाल मागवला आहे.सदरची कारवार्इ दडपण्यासाठी अधिकार्‍याची जोरदार लॉबींग सुरू असुन भ्रष्ट्राचारी अधिकायांनी शिवसेनेच्या मंञ्याना साकडे घातल्याचे वृत्त आहे.मुरबाड तालुक्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अशा नेते कार्यकर्ते यांनी खोती बिले रेकॉडींग करून कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा असुन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंञ्यानी याकामाची स्वतंत्र पथक नेमुन संबधितावर फौजदारी गुन्हे दाखल करून कंन्ट्रक्शन सोसायटया काळयायादीत टाकाव्यात अशी मांगणी होत आहे.(क्रमश)

No comments