0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मराठा, धनगर आरक्षणानंतर मुस्लीम बांधवांनी आरक्षणाची मागणी करण्यास सुरूवात केली आहे. मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्याविषयी महाविकास आघाडीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनेही मुस्लीम आरक्षणाला समर्थन दिलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांच्या घोषणेला पाठिंबा पाठिंबा दिला आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे. ठाकरे सरकार समाजाच्या हिताचे निर्णय घेईल असा विश्वासही यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. एकूणच शिवसेनेचा मुस्लीम आरक्षणाला पाठिंबा असल्याचे यामधुन सांगण्यात आले आहे. मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या काही वर्षांपासून मुस्लीम समाजातर्फे केली जात आहे. आता यासाठी सनदशीर मार्गानं लढा उभारणार असल्यांच खासदार हुसैन दलावाई यांनी सांगितलं आहे. मुस्लिम आरक्षणाचा निर्णय पृथ्वी चव्हाण मुख्यमंत्री असताना घेतला होता , त्यावर कुठल्याही प्रकारे स्थगिती नाही आहे , आता कशा पद्धतीने लागू करायचं यावर विचार विनिमय करून विषय घेऊ असे यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.

Post a comment

 
Top