0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |

ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्यामराव कोरडे यांचा आज वाढदिवस आगळया वेगळया पध्दतीने साजरा करण्यात आला.सामाजिक कार्याचा सलोखा वडिलोपर्जित जोपासत श्यामभाऊंच्या कार्याची प्रणाली नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे.
त्यांचा वाढदिवस वागळे येथिल मोरया ग्रुपच्या वतीने मोठया थाटात साजरा करण्यात आला.श्यामभाऊ कोरडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शालेय गरिब गरजू विद्दयार्थ्यांना तसेच अनाथाश्रमातील मुलांनाउपयोगी वस्तु,मिठार्इ त्याचबरोबर रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.2020 सालाचा वाढदिवस हा अविस्मरणीय राहिल कारण तुमचे माझ्यासाठी हे प्रेम आहेत हिच माझी खरी संपत्ती ठरली आहे अशा भावनाही यावेळी त्यांनी प्रकट केल्या.त्यांच्या वाढदिवसाला विविध मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना उदंड आयुष्य लाभो म्हणून शुभेच्छाही दिल्या.

Post a comment

 
Top