0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
डोळखांब म्हसा या 100 कोटीच्यावर रस्त्याचे काम गुजराथच्या ठेकेदारानी शेतकरी ग्रामस्थावर दहशत पसरून सुरू केले आहे.सदर रस्त्याच्या कामामुळे खोपीवली म्हसा धसर्इ रस्ता अर्धावर खोदार्इ करून पर्यायी मार्ग नसल्याने मुरबाड एसटी बसेस बंद करण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.शालेय विद्यार्थ्यांच्या 10 वी 12 वीच्या परिक्षा समोर असताना अतिदुर्गमभागात ठेकेदारांच्या मनमानी कारभाराने रस्ते खोदार्इ करून वाहानाची कोंडी केली आहे.निकृष्ट दर्जाचे काम करून अधिकार्‍यांना टक्केवारी देणार्‍या ठेकेदारानी एसटी बसेस बंद करून ठेवल्याने खोपीवलीचे ग्रामस्थ रमेश हुमणे यांनी कारवार्इची मांगणी करून शालेय विद्यार्थ्याना बस सेवा  सुरू करण्याची विनंती केली आहे.

Post a comment

 
Top