0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ,पावस रत्नागिरी  यांच्या माध्यमातून श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी पारायण 22 ते 28 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 2 ते सांयकाळी 6 पर्यंत ज्ञानेश्वर मंदिर पाचपाखाडी,ठाणे म्युनिसिपल ऑफिसच्या मागे आयोजित करण्यात आले आहे.सुमारे 725 वर्षापूर्वी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनह लिहिलेल्या श्रीज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाची त्याकाळची प्राकृत भाषा आज समजणे अवघड झाले आहे.रत्नागिरी जवळील पावस येथील साक्षात्कारी संत स्वामी स्वरुपानंद महाराज यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन या मूळ ग्रंथाचा समजण्यास सोप्या मराठी भाषेत ओविबध्द अनुवाद केला.पारायणासाठी इच्छुक साधकांनी 7666439315 व 9969010824 या नंबर संपर्क करावा असे आवाहन स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ यांनी केले आहे.


Post a comment

 
Top