0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
संपादक हेमराज शाह यांच्या 'वार्ता विशेष' या पुस्तकाचे प्रकाशन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.विविध विषयांवर लेखन करणाऱ्या लेखकांना संपादक हेमराज शाह यांच्या संपादनाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. तसेच लेखकांच्या विविध विषयांच्या लेखनामुळे समाजातील अनेक घडामोडींची सखोल माहिती लोकांना होते, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.'चित्रलेखा'च्या वतीने कथा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत साधारण 250 पेक्षा अधिक कथांचा सहभाग होता. यातून 30 कथा निवडण्यात आल्या. समाजातील विविध घटकांतील माहितीदृष्ट्या उपयुक्त ठरणाऱ्या या कथांना एका प्रवाहात आणण्यासाठी 'वार्ता विशेष' या पुस्तकाचे संपादन हेमराज शाह यांनी केले आहे.संपादक हेमराज शाह यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचे संपादन केले असून वार्ता विशेष हे त्यांचे 50वे पुस्तक आहे. ‘प्लास्टिक बंदी व पर्याय’ या विषयावरील निबंध स्पर्धेतील प्लास्टिक बंदीसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या लेखकांच्या कथा, निबंध यांचे संपादक हेमराज शाह यांनी ‘प्लास्टिक बंदी व पर्याय’ या पुस्तकाद्वारे संपादन केले आहे.यावेळी चित्रलेखाचे अध्यक्ष मौलिक कोटक, चित्रलेखा साप्ताहिकाचे वरिष्ठ पत्रकार देवांशू देसाई, तारक मेहताचे निर्माता आसित कुमार मोदी, जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास, जन्मभूमी वृत्तपत्राचे पत्रकार कन्हय्यालाल जोशी, कवी मुकेश जोशी उपस्थित होते.

Post a comment

 
Top