0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी परम बीर सिंह, भापोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त होत असल्याने होणाऱ्या रिक्त पदावर श्री.सिंह यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक असलेले श्री.सिंह हे भारतीय पोलीस सेवेच्या सन 1988 च्या तुकडीतील अधिकारी आहेत.श्री.सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपिन के.सिंग यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.

Post a comment

 
Top