0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनवेळा पत्र लिहून भारतरत्न द्या अशी मागणी केली होती. परंतु यामध्ये नेमकी काय अडचण आली याचं उत्तर मिळालं पाहिजे अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा विषय सुरु असताना विरोधी पक्षाच्यावतीने गोंधळ घालण्यात येत होता. राज्यसरकारकडून अपेक्षा करता मग तुम्ही सत्तेत असताना का दिला नाही अशी विचारणा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या मुद्दयातील हवाच काढून टाकली. आपलं कामकाज प्रथेनुसार चालतं. आजच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृती दिन आला आहे असं नाही. यापुर्वीही येवून गेला आहे. त्यामुळे मी वीर सावरकरांना आदरांजली वाहतो. त्यांच्या कामाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु सुधीर मुनगंटीवार व इतर नेत्यांना नेमकं काय राजकारण करायचं आहे की कोणता स्वार्थ साधायचा आहे हेच कळत नाही असेही अजितदादा पवार म्हणाले. वीर सावरकरांचे योगदान कोण विसरु शकत नाही. मात्र त्यांचे वेगवेगळे विचार होते. बैल, गायी याबद्दल काय बोलत होते.ते बोलून काही वाद निर्माण करायचे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. असे सांगतानाच त्यांना भारतरत्न मिळावा अशी आमचीही मागणी आहे असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सावरकरांबद्दल शिदोरी मासिकात छापून आलेला मजकुर वाचून दाखवत वातावरण बिघडवू पहात असतानाच राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सावरकरांचा अवमान विरोधी पक्षनेते करत आहेत. सन्मान देण्याचा विचार करता आणि त्यांच्याविषयी सभागृहात वाईट वाचून दाखवता हे योग्य नाही असे खडेबोल सुनावले.

Post a comment

 
Top