0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
समाजात अनेक लोकं विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत असतात,त्यातील काही लोकांना आपसूकच प्रसिद्धी मिळते,तर काही लोकांना प्रसिद्धी साठी धडपडाव लागत,तर काही लोकं प्रसिद्धी पासून चार हात लांब राहून आपलं कार्य करत असतात,अश्या प्रकारे काम करणाऱ्यांवर कधी ना कधी, कोणाची तरी नजर पडतेच पडते.मग अश्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्याकरिता कादंबरीसारखं दुसरं काय असू शकतं.? म्हणून लेखिका सुनीता तांबे यांनी लेखणी हातात घेतली.एखाद्या व्यक्तीचं कार्य हेरून ते कादंबरीत उतरवणं म्हणजे एक आव्हानच असतं, कारण कादंबरीतील प्रसंग वाचकांना वाचनीय व्हायला हवेत त्याची मांडणी व्यवस्थित होणे गरजेचे असते,परंतु सुनीता तांबे यांनी हे शिवधनुष्य अचूक पेललं आणि  पहिल्याच प्रयत्नात त्यांना घवघवीत यश मिळालं याला तर सोने पे सुहागाच म्हणावं लागेल
त्यांनी लिहिलेल्या पहिल्याच पुस्तकाची दखल महाराष्ट्र राज्य शासना द्वारे घेण्यात आली असून चरित्र या गटासाठी महाराष्ट्र राज्य शासनातर्फे  २०१८ चा स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड़मय पुरस्कार योजने अंतर्गत न.चिं.केळकर हा साहित्य पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.त्यांनी लिहिलेली कादंबरी ही,स्वतः अनाथ असूनही  अनाथ मुलांमुलींचे पुनर्वसन हे आपल जीवनध्येय मानलेल्या लोकसत्ता पुरस्कृत तरूण तेजांकित व्यक्तिमत्त्व  सागर रेड्डी या अभियंत्याच्या संपूर्ण जीवन कार्यावर आधारित आहे.त्या कादंबरीचं नाव "सागर रेड्डी, नाम तो सुना ही होगा" असं असून ही कादंबरी २०/०३/२०१८ रोजी अक्षयभारती  प्रकाशनाद्वारे सौ वर्षा विनोद तावडे, सौ सुनंदाताई पवार, श्रीमती अलका मांडके आदी मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली,आणि म्हणता म्हणता शेकडो प्रति खपल्या गेल्या,वर्षभरातच तिसरी आवृत्ती काढावी लागली. समाजातील अनेक स्तरावरून अनेक वाचकांकडून सुनिता तांबे यांच्या लेखनशैलीस दाद मिळाली . राज्य शासनाच्या पुरस्कारामुळे लोकमान्यतेसोबत राज्यमानतेचीही मोहर या उदयोन्मुख गुणी लेखिकाच्या लेखनावर उमटली आहे. सदर पुरस्कार २७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा दिन गौरव समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

Post a comment

 
Top