0
BY – युवा महाराष्ट्र लाइव –  दिल्ली |
राजधानी दिल्लीतील हिंसाचार सध्या तरी थांबला आहे. आज दिल्लीत शांतता असून हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाहीये. दिल्ली शांत व्हावी दिल्लीतील हिंसाचार थांबावा असं सगऴ्यांनाच वाट होते. हिंसाचार थांबावा यासाठी स्वत:हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दिल्लीत भेट दिली होती. त्यावरून आज दिल्लीमध्ये कमालीची शांतता आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 34 जण मृत्युमुखी पडले आहे. तर 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत.उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार आता दिल्लीत कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दिल्लीच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना आश्वासन दिले आहेत. दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून कॉंग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला होता. केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल केली होती. सोनिया गांधी यांच्यानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही अमित शहा यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हंटल आहे. 

Post a comment

 
Top