0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
डोळखांब टोकावडा म्हसा रस्त्याचा काम निकृष्ट दर्जाचा 110 कोटीच्या कामात 50 कोटीचा घोटाळा गुजराथचा ठेकेदार स्थानिक ठेकेदार गुन्हेगारी दहशत पसरवणार्‍याना हाताशी धरून करत असुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अधिक्षिक अभियंता यांचा ठेकेदाराला बळ मिळत आहे.इस्टीमेंन्ट प्रमाणे काम केले जात नाही.कामावर प्रत्यक्षात संबधित अधिकारी ढूंकून पहात नाहीत.तुटलेल्या मोरव्यांचे पार्इप तुकडे जोडले जात असुन मातीवर खडी टाकून सार्इट पट्टी खोदुन निकृष्ट रस्ता बनवला जात आहे.
मुरबाड मधील शेतकर्‍यांच्या जमिनीचा मोबदला दिला जात नसुन रस्त्याचे काम दहशतीने सुरू आहे.तसेच या मनमानी गैरकामाला खोपीवलीचे शेतकरी रमेश हुमणे यांनी हारकत घातल्याने या रस्त्यामधील भ्रष्टाचार समोर आला आहे.गुजराथचा ठेकेदार महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची मदत घेवुन काम करत आहे.त्यांना स्थानिक पुढारी ठेकेदारीसाठी मदत करून निकृष्ट कामाना अभय देत आहेत.बोगस कामे करून बिले काढत आहेत यावर महाराष्ट सरकारच्या मंञ्यानी चौकशी करून कारवार्इ करावी सदरचे काम हॅबरीड अ‍ॅन्टीबॅस योजने अंतर्गत सुरू असून अधिकार्‍यांना कोटी रूपायाची टक्केवारी दिली जात आहे.(क्रमश)

Post a comment

 
Top