0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – बुलडाणा  |

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत कार्यवाही होत नसेल तर अधिकाऱ्यांनी आपल्या बदल्या करुन घ्याव्यात, अशा शब्दांत शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. 'जिल्ह्यातील वरली-मटका, जुगार, दारू बंदी होत नसेल, तर तुम्ही काय करता? हे धंदे तिथे चालतात जा, माझ्याकडे हे चालणार नाही. दोन दिवसात अवैध धंदे बंद झाल्याचा रिपोर्ट मिळाला नाही, तर तुमचे बाडबिस्तार गुंडाळा, अशा शब्दात राज्याचे अन्न व औषध मंत्री आणि बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

Post a comment

 
Top