0
BY – विशेष प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सरकारी कामापासून वृत्तपत्र छपार्इ पर्यंत आणि भाजीपासून नाश्ता जेवनापर्यंत सर्वच खरेदीवर शासनाचा जी.एस.टी कर होतो मात्र,वॉर्इनशॉप बियरबार अन्य दुकानातील  दारू खरेदीची पावतीच  (बिल) बनले जात नसल्याने शासनाची कोटी रूपये  जी.एस.टी कराचा  नुकसान होत  आहे.मुरबाड  शहर  व तालुक्यात जी.एस.टी कर  मोठया प्रमाणात  बुडवला जात आहे.
          दररोज कोटी रूपयाची दारू विक्री होते मात्र,एक टक्का लोक पक्का बिल घेतात शिवाय दारू देशी असो किंवा विदेशी त्याचं पक्का बिल होतं म्हणजे दारू  पिणार्‍यांचा  पुरावा होर्इल यासाठी दारू  खरेदी करणारे पिणारे दारूचा पक्का बिल घेत नाहीत याचाच फायदा वॉर्इनशॉप अन्य दारू बार दुकानदारांनी घेतला असून दारू पिऊन एखाद्दयाचा मृत्यु झाला,अपघात झाला त्याची दारू  म्हणून नोंद होत नाही.मध्यपान करून अपघात झाला त्यांच्या मृत्युची नोंद होते मात्र,सदरची दारू  बनावट होती,विषारी होती यांचा थांगपत्ता लागत नाही.शासनाने मुरबाड  शहर  व तालुक्यात दारू विक्रेत्यावर  कारवार्इ करावी अशी मागणी होत आहे.
          शासनाचा जी.एस.टी कर   दारू  खरेदीवर ठराविक देत असले तरी बनावट दारूचाबिल देता येत नसल्याने दारूडे दारूचा बिल पक्का घेत नसल्याने बनावट दारूचे पेव फुटले आहे.
          वॉर्इनशॉप दुकानात लावलेल्या,हॉटेलमध्ये लावलेल्या सी.सी.टि.व्ही कॅमेर्‍यात विक्री खरेदी,खाण पिणं कैद हहोते मात्र,त्याकडे उत्पादन शुल्क विभाग करविभाग दुर्लक्ष करतात त्याचा गैरफायदा वॉर्इन शॉप वाले घेत असून त्यांच्याकडून जी.एस.टी बिले कोणत्या दारूच्या कंपनीची सादर केली जातात,राज्यात अशा किती दारूच्या कंपन्या आहेत,वॉर्इनशॉप,बारमध्ये कोणत्या दारूची विक्री केली जाते यांची चौकशी करून दारू विक्री बिल स्विपमशीनवरून द्दयावे,जी.एस.टी कराचं पितळ उघडं करून दारू विक्रेत्यावर कारवार्इ करावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.Post a comment

 
Top