BY – युवा महाराष्ट्र
लाइव – मुंबई |
" मुंबई कप तायक्वांदो " स्पर्धा दिनांक ०९ फेब्रुवारी
२०२० रोजी बारादेवी म्युनसिपल शाळेत संपन्न झाली. सदर स्पर्धेत २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे
प्रमुख पाहुणे माननीय श्री. सचिन पडवळ- नगरसेवक बृहन्मुंबई महानगर पालिका तसेच इतर
मान्यवर यांची उपस्थिती होती. स्पर्धेच्या आयोजनामध्ये श्री. सुधाकर निवृत्ती
आलदर, मुख्य प्रशिक्षक, श्री. रोहित कदम व श्री.अभिषेक शिंत्रे, सहाय्यक प्रशिक्षक
यांचा मोलाचा वाटा असून ऑल राउंडर अकॅडेमीच्या
विद्यार्थांनी उल्लेखनीय कामगिरी करून स्पर्धेमध्ये २२ सुवर्ण पदके , २७ रौप्य पदके, ३० कांस्य पदके
पटकावून ऑल राउंडर अकॅडेमीला प्रथम पारितोषिक
मिळवून दिले . ऑल राउंडर अकॅडेमीच्या सर्व सभासदांनी व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
केले. मुंबईतील सर्व क्रीडास्थरांवर ऑल राउंडर
अकॅडेमीचे विशेष कौतुक केले जात आहे.
Post a comment