0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड शहरात कोर्टासमोर असलेला वॉर्इनशॉप नगरपंचायतीच्या अनधिकृत बिल्डींगमध्ये  थाटलं आहे.या वॉर्इनशॉपमध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मद्दयापींचा धिंगाना असतो.रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या महिला शालेय विद्दयार्थीनी नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
          वॉर्इन शॉप देशी विदेशी दारूची विक्री करतो.दारू विकत घेतलेले काही मद्दयापी शेजारील दुकाने कार्यालयाच्या गच्ची पायर्‍यावर दारू पिवून बाटल्या फोडतात त्यावर पोलिसांनी अनेक वेळा कारवार्इ  केली मात्र,पुन्हा मद्दयपींनी बाटल्या रस्त्यावर टाकण्याचा धिंगाना घातला असुन सदर वार्इन शापलाच टाळा लावावा अशी मांगणी नागरिकांकडुन होत आहे.भारत वार्इनशॉप याला नगरपंचायतीच्या प्रशासकीय जागेत कोणी लायसन्स दिले अशा अनेक तक्रारी झाल्या.उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी अनेक वेळा धाडी टाकल्या परंन्तु त्याच्यावर कारवार्इ झाली नाही पावसाळयापुर्वी उत्पदन शुल्क अधिकार्‍यानी भारत वार्इन शॉपवर छापा टाकून बनावट दारू जप्त केली होती परंन्तु सदरचा गुन्हां दडपण्यात वार्इनशॉप मालकाला यश आल्याने मद्यापीचा अडडा तेजीत आला आहे.मुरबाड शहरात अनेक जणाचा देशी विदेशी दारू पिवुन मृत्यु झाला असुन कायदेशीर तक्रार नसल्याने त्यांची मृत्युची नोंद शासन पुस्तकी झाली नाही मुरबाड शहरात व तालुक्यात मोठया प्रमाणात बनावट दारू विक्री होते याकडे उत्पादन शुल्क अधिकार्‍यांचे होणारी डोळेझाक गंभीर बाब आहे.भारत वार्इनशॉप यांचा दारू साठवन दोन गाले तेथेच असुन दारूच्या स्टॉकची तपासणी कोण करतयं हे गुलदस्त्यातच आहे.सदर वार्इनशॉपचा पार्टनर राजकीय सत्ताधार्‍याचा हस्तक असल्याची चर्चा असुन वार्इनशॉपच्या समोर अनेक वेळा हाणामार्‍या होतात शासनाने भारत वार्इनशॉपच्या गोडावुन ज्या  ठिकाणी लायसन्स दिला आहे तेथे दुकान चालवला जातोय किंवा नाही बनावट दारू विक्री होते का ? मद्यपान करणार्‍याकडे मद्यपान करण्याचा लायसन्स आहे त्यालाच दारू दिले जातय का ? याची चौकशी करून तात्काळ कारवार्इ करावी सदरचा भारत वार्इनशॉप कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यासमोर आजुबाजुला काय आहे याची चौकशी करावी.


Post a comment

 
Top