web-ads-yml-750x100

Breaking News

भारत संचार निगम लिमिटेडचे मुरबाड उपशाखा अभियंता विलास नारखेडे व नंदू मुंडे हे सेवानिवृत्त

BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
भारत संचार निगम लिमिटेडचे जाळे संपूर्ण देशात असून या दूरसंचारच्या माध्यमातून ग्राहकांच्या  24 तासाच्या सेवेत कार्यरत म्हणून मुरबाड उपशाखा अभियंता विलास नारखेडे व नंदू मुंडे यांचे योगदान अमुल्य ठरले आहेत.विविध विभागातून ग्राहकांना सेवा देत मुरबाडमध्ये उपशाखा अभियंता म्हणून विलास नारखेडे यांनी आपली कामगिरी चोखरित्या बजावली आहे तर एक कर्मचारी म्हणून नंदू मुंडे,भोर्इर यांनी मुरबाडच्या सेवेला आपल्या घामाकडेही न पाहता कार्यशील चांगल्यारित्या जपली आहे.
कार्याचा अनुभव नाही तर माणूसकी प्राप्त करणारे असे निस्वार्थी मनाचे अधिकारी आज सेवानिवृत्त झालेत.उपशाखा अभियंता म्हणून विलास नारखेडे यांनी आपल्या जिवनातील 35 वर्षे 5 महिने आणि 22 दिवस भारत संचार निगम लिमिटेड ग्राहकांच्या हाकेची साथ म्हणून आपल्या कार्याची पाहोच पावती प्राप्त करून सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांच्या कार्याचा ठसा भारत संचार निगम लिमिटेड समवेत सर्व ग्राहक आठवणीत ठेवतील.त्यांच्या सेवानिवृत्तामध्ये त्यांनी उल्लेखनीय केलेल्या कामगिरी बद्दल त्यांचा भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने सन्मान करण्यात आला.व्यक्तीमत्वातून नैतिकता टिकवणार्‍या अशा व्यक्तींना संपुर्ण ठाणे जिल्हयासह कल्याण,मुरबाड,शहापूर तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या भावी पुढिल वाटचालीस शुभेच्छा  दिल्या आहे.
मुरबाड उपशाखा अभियंता विलास नारखेडे व नंदू मुंडे,भोर्इर हे कार्यालयातून सेवानिवृत्त जरी झाले असतील तरी आजही ते आमच्या मनातून कधीही सेवानिवृत्त होणार नाहीत हे सत्य आहे जे कोणीच नष्ट करू शकणार नाही आणि होणार ही नाही.आजही त्यांनी दिलेल्या महत्वपुर्ण कार्याला आमची युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी व स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र कायम आठवणीत ठेवेल.व नेहमी त्यांच्या समवेत निर्भिडपणे उभी असेल.त्यांच्या कामगिरीला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा.

No comments