0
BY – युवा महाराष्ट्र लाइव  - मुंबई | 
शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषीमंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी 7 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते.त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषिमंत्र्यांनी केली असून आज त्यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक येतात का, अशी विचारणाही यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली.शेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषीमंत्री भुसे यांनी सुरु केला असून कृषी सचिव, आयुक्त यांनी 15 दिवसातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना केल्या आहेत. या भेटीत पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही कृषिमंत्री भुसे यांनी विभागाला सूचना दिल्या आहेत.

Post a Comment

 
Top