web-ads-yml-750x100

Breaking News

मुरबाडचा विजयी इतिहास कायम राखला ; मुरबाडच्या कराटेपटूनी पटकावले गोल्ड, सिल्व्हर,ब्रॉन्स मेडल

BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
विजयाची गाथा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून मुरबाड सारख्या ग्रामीण भागाचा नावलौकिक झाला.या विजयात मुरबाडचा महत्वपूर्ण भाग कराटे प्रशिक्षणाला मिळाला आहे.जेव्हा मुरबाड सारख्या भुमिला मास्टर वसंत जमदरे सर,धीरज पथारे सर,ब्लॅक मास्टर मधुकर गायकर सर लाभतात तेव्हा मुरबाडचे कराटेपटु राज्यस्तरीय जाऊन विजयाचा झेंडा फडकविल्याशिवाय राहत नाही आणि हे ठाणे जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेने अनुभवले आहे.कोणतेही कराटेच्या स्पर्धा असो मग ती जिल्हास्तरीय असो राज्यस्तरीय असो किंवा देशस्तरीय या स्पर्धेत मुरबाडचे कराटेपटु मात्र आजपर्यंत विजयीच झाले आहे हे पुन्हा एकदा मुलूंड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत दिसून आले आहे.
कराटे स्पर्धा जेथे आयोजित केले जाते तेथे मुरबाडचे कराटेपटु इतिहास घडविण्यात सक्षम झाले आहेत.असे म्हणावे लागेल नुकत्याच झालेल्या मुलूंड येथिल कराटे स्पर्धेत 17 च्या 17 विद्यार्थ्यांनी विजय संपादन केला आहे.आणि त्यांच्या या ढाण्यावाघाच्या विजयाचे श्रेय मास्टर वसंत जमदरे सर धीरज पथारे मधुकर गायकर यांना पालकांनी दिले आहे.पाल्याची कुशलता आणि धाडस आज तमाम जनतेला पाहण्यास मिळत असुन याच कराटेपटुमुळे आज मुरबाडचे नाव पुन्हा विजयाच्या शिखरावर नावलौकिक झाले आहे.
या लहान कराटेपटुनी मुरबाडच्या मातीचा सन्मान करत जागतिक पातळीवर व महाराष्ट्राच्या नकाशावर मुलूंड येथील युरो एशियन इन्टरनॅशनल कराटे चैंपियन मुलूंड आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला व दाखवून दिले कि हम किसीसे कम नही युरो एशियन इन्टरनॅशनल कराटे चैंपियन मुलूंड आयोजित कराटे स्पर्धेत एकूण 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये मुरबाड सरळगांव येथील विद्यार्थ्यांनी गोल्ड सिल्व्हर ब्राँन्स मेडल प्राप्त करून विजय पटकावला आहे.
यामध्ये गोल्ड मेडलिस्ट हर्ष लाटे,शहारूख नुर मोहमद पठाण,हितेश शेलार,संदेश घायवट,श्रावणी खेडकर,अजय लिहे,सुरज गायकर,वेदांगी तुपे,तन्वी गुनार्इ,कुमार टेकडे हे असुन सिल्व्हर मेडलिस्ट,रिया घोरड,स्वयम हिंदूराव,साक्षी बांगर,सेल्फी अन्सारी,विश्‍वजित रेडकर,खुशाल सकट या विद्यार्थ्यांनी मानाचा मान मिळवत विजय मिळवला आहे.
त्यांच्या या धडाकेबाज कार्याची प्रशंसा सर्वत्र होत असुन त्यांच्या पालकानी मास्टर वसंत जमदरे बॉक्सींग मास्टर धीरज पाथारे सर ब्लॅकबेल्ट मास्टर मधुकर गायकर यांचे आभार मानले आहेत.विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचा ठसा मुरबाडमध्ये उमटला असून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.स्पर्धेचे आयोजक हँसी हसन यांनी केले असून त्यांचेही कौतुक करण्यात आले आहे.


No comments