0
BY – युवा महाराष्ट्र लाइव –  कल्याण |
वाहतूक कोंडी सोडण्यासाठी तसेच रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या भंगार आणि बेवारस दुचाकी चारचाकी गाड्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर ट्राफिक पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे.
कल्याण डोंबिवली शहरात रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या बेवारस आणि भंगार गाड्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. एवढेच नाही तर या वाहनांमुळे अपघाताची शक्यताही आहे. पण जास्त रस्त्याच्या सौंदर्यावर याचा परिणाम होतो आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी तसेच रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केडीएमसीचे नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी युक्ती लावत रस्त्यावर उभ्या असलेल्या भंगार आणि बेवारस दुचाकी चारचाकी गाड्यांवर कारवाईचे आदेश दिले. आयुक्ताच्या आदेशानंतर केडीएमसी आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई सुरू केली आहे. 

Post a comment

 
Top