0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
खापरादेव मंडळ हे नेहमीच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते.आरोग्य शिबिर , दहीकाला उत्सव , गुढीपाडवा शोभायात्रा , विद्यार्थी गुणगौरव , स्वच्छता अभियान , श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात हातखंडा असलेले खापरादेव मंडळ यांचा नुकताच मुंबई मधील करिरोड (पूर्व) येथील रामदूत वसाहतीमधील पटांगणात शिस्तमय आणि भक्तिमय स्वरूपात माघी श्रीगणेशोत्सव साजरा केला. हे मंडळाचे २० वे वर्ष असून या उत्सवात धार्मिक कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा तितक्याच शिस्तमय पद्धतीने साजरे करण्यात आले. याप्रसंगी विविध स्तरावरील मान्यवरांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सदिच्छा भेटी दिल्या. या सोहळ्यात साईबाबा शाळेचे क्रीडा प्रशिक्षक योगेश साळवी , अभिनेते व निर्माते सुरेश डाळे पाटील , शैलेश खांबे , सिने दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर तेटांबे , प्रसिद्ध निवेदक दत्ता चाळके , संतोष चौगुले , महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विभाग प्रमुख सचिन शिंदे , स्वप्नील देसाई आदी मान्यवरांचा अध्यक्ष आणि सचिव यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी अध्यक्ष जितेंद्र तावडे , सचिव तुषार लाड , खजिनदार सुयोग नारकर , चंद्रकांत नारिंग्रेकर , विशाल माने , प्रसाद तोंडवळकर , सागर ढोलम , राकेश हडकर , मयूर घोलप , योगेश घाडगे , गणेश साटम , विवेक सकपाळ , ओमकार तावडे ,  सुनिल गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. अशा तऱ्हेने भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात हा माघी श्रीगणेशोत्सव सोहळा संपन्न करण्यात आला.


Post a comment

 
Top