0
BY – मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून खत तयार करणाऱ्या नागपूरमधील हंजर बायोटेक कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कंपनीमधील गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
आमदार विकास ठाकरे यांनी नागपूरमधील भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी कंपनीच्या चौकशीचे आदेश दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, “हंजर कंपनीच्या व्यवहाराबाबत विधी व न्याय, सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष समितीमार्फत चौकशी सुरू आहे. या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे 2 हजार 115 कोटी इतका दंड वसुल करण्यात आला आहे.

Post a comment

 
Top