0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पनवेल |

दोन महिन्यापूर्वी अनुसुचित जातीचा युवक राकेश हरकुळकर यांचेवर पुर्व वैमन्यस्यातून जातीयवादी गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला होता. सदरचा गुन्हा नोंद करतांना पोलीस उपनिरीक्षक सावंत (खांदेश्वर पोलीस ठाणे) यांनी आरोपींना वाचवण्यासाठी गुन्ह्यात जाणिवपुर्वक असंख्य त्रृटी ठेवून अॅट्रोसिटीचा गुन्हा असुनही त्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली व फरार आरोपींना अटक करण्यास विलंब करून त्यांना पुरावे नष्ट करण्यास संधी देवुन इतर 6/7 आरोपी असतांनाही फक्त तीनच आरोपी FIR मध्ये नमुद केली. इतर मारेक-यांशी अर्थपुर्ण व्यवहार करुन त्यांना अभय देण्याचा प्रयत्न केला असल्याने पो. उपनिरीक्षक सावंत यांनी आपल्या पदाचा व हुद्याचा जाणिवपुर्वक गैरवापर केला असल्याने त्यांचेवर अॅट्रोसिटी कायद्याचे कलम चार अंतर्गत कारवाई करुन त्यांना ही सदर गुन्ह्यात सहआरोपी करावे या मागणी बाबत मा. पोलिस आयुक्तांशी चर्चा करुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबतचे आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल यांनी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती च्या शिष्टमंडळास दिले. तसेच सदर गुन्ह्यात भादवि.संहितेचे कलम 307 समाविष्ट करण्यासंबंधी मा. पोलिस उपायुक्त परिमंडळ-2.पनवेल मा.अशोक दुधे यांचेशी मोबाईलवर संवाद साधुन वरिष्ठांनी मौखिक संमती दिली असल्याचे शिष्टमंडळास सांगितले. तसेच इतर फरार आरोपींचा कसोशीने शोध घेऊन त्यांनाही तातडीने अटक करण्याचे आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल यांनी चर्चेसाठी बोलावलेल्या शिष्टमंडळास दिले आहे.तसेच दि. 28.फेब्रुवारी.2020. रोजी मा. मा. कैसर खलीद (भापोसे) विशेष पोलीस महानिरीक्षक, नाहसं. महाराष्ट्र राज्य. यांनी वरील विषया संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल यांना कागदपत्रांसह चौकशीसाठी पाचारण केले असल्याने. व तत्पुर्वी सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल यांनी जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या असल्याने पनवेल पोलीस प्रशासनाविरोधात होऊ घातलेले "आमरण उपोषण" तुर्तास स्थगित ठेवण्यात आले आहे

Post a comment

 
Top