BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खुर्माबाद येथे आज सकाळी
नऊच्या सुमारास शेतकरी दत्तात्रय विश्वनाथ नवलकार यांच्या गोट्याला भीषण आग लागली.
या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.विद्युत वितरण कंपनीचे
मुख्य खांबावरील केबल हा शेतकऱ्याच्या गोठ्याच्या बाजूला असून आज सकाळी अचानक शॉर्टसर्किट
झाल्याने शेतकरी दत्तात्रय नवलकार यांच्या गोठ्याला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेतकऱ्याचे
शेती मशागत संबंधित महत्त्वाचे साहित्य, पेरणी यंत्र, जनावरांना लागणारे खाद्यपदार्थ
व आदी वस्तू असे एकूण 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा शासनाचा प्राथमिक अहवाल
प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीचा हा भोंगळ कारभार असून सुद्धा संबंधित
अधिकारी बोलावून एकही अधिकारी घटनास्थळावर अद्यापही हजर झालेले नाही. शेतकऱ्याचा झालेला
नुकसानीचा अधिकाऱ्यांना कुठलाही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर
तात्काळ कारवाई करावी अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केली आहेत.
Post a comment