0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीय पगारदारांना प्राप्तिकरासंबंधी खुशखबर देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. नोकरदारांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

१० लाखापर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के प्राप्तिकर असेल जो पूर्वी २० टक्के होता. १० ते १२.५ लाख उत्पन्नावर अगोदर ३० टक्के कर होता तो २० टक्के करण्यात आला आहे. तर १२.५ ते १५ लाख उत्पन्नावर २५ टक्के कर लागू करण्यात आला असून पूर्वी हा कर ३० टक्के होता. १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर लागू करण्यात आला आहे. ५ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.

Post a comment

 
Top