0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भावकादेवी प्रोडक्शन "तर्फे बेस्ट वसाहत , शिशु विकास हॉल , परेल , मुंबई येथे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या उपस्थितीत नुकताच आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट सोहळा संपन्न झाला यात प्रामुख्याने १८ निवडक लघु चित्रपट सादर करण्यात आले असून त्यामधून प्रथम क्रमांक  "कासा दे सा " , द्वितीय क्रमांक  "तरंग " आणि तृतीय क्रमांक  "मोक्ष "  या तीन लघु चित्रपटांची निवड करण्यात आली. त्याबरोबर विशेष ज्युरी अवार्ड म्हणून  "कासा दारू" या तामिळ फिल्म ची निवड करण्यात आली. 
या सर्व लघु चित्रपटांचे परीक्षण ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक पितांबर काळे , नरेंद्र कोन्द्रा आणि दिग्दर्शक किशोर बेळेकर यांनी केलं या सोहळ्यात मनसे सरचिटणीस शांताराम कारंडे , अभिनेता कांचन पगारे , अभिनेता प्रणव रावराणे, गणेश मयेकर, दिनेश रिकामे , जनार्दन कदम आदी मान्यवर उपस्थित होते  तर सिद्धांत जाधव , अमर पारखे , राज जाधव , तेजस मोरे , संजय कसबेकर , निलेश पाठक, देवेश सुद्रीक , अंकिता ढोकले, जितेंद्र नंदनवार , स्वप्नील ,यांचे विशेष सहकार्य लाभले. 
तसेच या सोहळ्यात पॅराडीगम एंटरटेनमेंट , शांताराम कारंडे फॅन्स फाऊंडेशन , शीतल कॅटरस , नृत्य दिग्दर्शक किरण काकडे आणि मातोश्री फाऊंडेशन यांनी विशेष योगदान दिले. अशा तऱ्हेने हा आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Post a comment

 
Top