0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा आज म्हणजेच 18 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी ही परिक्षा देत आहेत. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण 15,05,027 विद्यार्थ्यांपैकी 8,43,552 विद्यार्थी तर 6,61,325 विद्यार्थिनींचा समावेश आहे. राज्यभर एकूण 3,036 परीक्षा केंद्रे आहेत.आज बारावीची परिक्षा सुरू होत आहे. 18 मार्चपर्यंत परिक्षा सुरू राहणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षेमध्ये सहभागी होतील. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आणि आयडी कार्ड परीक्षा केंद्रांवर घेऊन यावे. परीक्षेच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रात उपस्थिती राहणे आवश्यक असणार आहे.

Post a comment

 
Top