0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
संपुर्ण राज्यात शेतकरी कर्जमाफी महिला अत्याचार विकासकामे या विरोधात भाजपाने तहसिल कार्यालयावर मोर्चे काढले परंन्तु या मोर्चाकडे लोकानी पाठ फिरवल्याचे चित्र मोर्चाच्या गर्दीवरून दिसून आले.मुरबाड मध्ये भाजपा शिवसेना नेते एकाच व्यासपिठावर असतात पदे ठेकेदारी वाटून घेतात मग भाजपाचा मोर्चा कोणाच्या विरोधात होता.शिवसेनेच्या की काँगे्रस राष्ट्रवादीच्या अशी नाक्या नाक्यावर चर्चा सुरू आहे.मुरबाड तालुक्यात सर्वत्र भाजपाची सत्ता आहे.त्यातील मोर्चात फक्त काही ठराविक लोकप्रतिनिधी पदाधिकारीच उपस्थित होते मोर्चाकडे सामान्य नागरिकानी पाठ फिरवल्याने मुरबाडचे राजकारण वेगळया वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.भाजपाचे तात्कालीन मुख्यमंत्री मुरबाडला दोन वेळा आले होते.त्यावेळी त्यांनी सार काही ठिक आहे कर्ज माफी पेन्शन योजना पारदर्शक कारभार मुरबाड मध्ये रेल्वे भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा नारा दिलां होता मात्र मुरबाड मध्ये भाजपाचाच आमदार खासदार आणि सर्वत्र सत्ता असताना सदरचा मोर्चा त्यांच्या अपयशा विरोधात होता काय ? अशी चर्चा सुरू आहे.मुरबाड तालुक्यातील शेतकरी प्रकल्पग्रस्त वन हक्क प्लॉट धारक वनेजमिनी शर्तशितल 32 ग घरकुले शौचालय स्मशानभुमी विद्युत पुरवठा पाणी आरोग्य रोजगार शेती अशा अनेक समस्या शासनदरबारी प्रलंबित आहेत.प्रशासकीय अधिकारी जनतेची कामे करत नाहीत याकडे भाजपा सत्ताधारी लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे.मुरबाड नगरपंचायत हद्दीत प्रचंड अनाधिकृत बांधकामे झाली आहेत.अनाधिकृत बांधकामाना करआकरणी केली जात आहे.पाणीपट्टी घरपट्टी लोकांवर लादल्या जात आहेत.नगरपंचायत भ्रष्टाचाराचा अडडा बनला आहे.तीन वर्षे आपंगाचा निधी वाटप झाला नाही.अनाधिकृत गाले विक्री केली.अनाधिकृत बांधकाम असलेल्या मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीला अभय दिला त्याचं बरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारी कामात काही कोटीचा भ्रष्टाचार झाला कामे न करता निधी काढला पर्यटनस्थळासह अनेक कामात भ्रष्टाचार झाला त्या विरोधात भाजपाने मोर्चा काढला असेल तर त्यांची महाराष्ट्र शासनाने दखल घेवुन कारवार्इ केली पाहिजे.खोटया कामावर स्थगिती ठेवुन चांगले प्रकल्पाना कामाना मंजूरी दिली पाहिजे अशी चर्चा मुरबाड मध्ये केली जात आहे.

Post a comment

 
Top