BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
ठाणे शहरात
महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या व प्रस्तावित विविध नागरी कामांचा
भुमीपूजन सोहळा व वास्तूंचा लोकार्पन सोहळा 6 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे यांच्या हस्ते व नगरविकास,सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) तथा पालकमंत्री ठाणे
जिल्हा एकनाथ शिंदे,गृहनिमार्ण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत
संपन्न होणार आहे.महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षेखाली हा सोहळा होणार असून
या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन ठाणे
महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
सकाळी 11.30 वा.मुख्यमंत्री महोदयांचे ठाणे नगरीत आगमन होणार
आहे.सर्व प्रथम तीन हात नाका येथे उभारण्यात आलेल्या हिदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्यदिव्य स्मारकाचे लोकार्पण हस्ते होणार
आहे. समुह विकास योजनेच्या(क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचा भूमीपूजन
सोहळा मुख्यमंत्र्याच्या हस्ते दुपारी 11.45. वा संपन्न होणार आहे.तद्रंतर
मुख्यमंत्री उद्वव ठाकरे दुपारी 12.30 वा. डॉ.काशिनाथ घाणेकर नाटयगृह येथे
होणाऱ्या मुख्य लोकार्पण सोहळयास रवाना होणार आहेत.यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या
पथदर्शी विकासाचे ठाणे या कॉफीटेबलचे प्रकाशन मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार
आहे.यावेळी विविध नागरी कामांचे उद्घाटन तसेच लोकार्पन संपन्न होईल.राष्ट्रीय व
आंतराष्ट्रीय स्तरावर ठाणे शहराचे महत्व अधोरेखित करण्याबरोबरच शहरामध्ये उद्योग
उभारणीस चालना मिळून रोजगाराच्या संधी निमार्ण व्हाव्यात या दृष्टिने ठाणे ग्लोबल
इम्पॅक्ट हबचे ई-उद्घाटन व संकेतस्थळाचे अनावरण करण्यात येणार
आहे.स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत खाडी किनारा प्रकल्पाचे ई-भूमीपूजन करण्यात येणार
आहे.
सदनिका स्टॉलचे वाटप
महापालिका क्षेत्रातील दिव्यांगाचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी
विविध योजना राबविण्यात येत असून यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात बीएसयुपी
योजनेतंर्गत सदनिका वाटप व रोजगारासाठी स्टॉलचे वाटप करण्यात येणार
आहे.अनाथ,निराधार,निरश्रीत बालके तसेच एचआयव्हीबाधित पालकांची मुले यांना
उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक
स्वरुपात अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
Post a comment