0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, उपमहापौर  सुहास वाडकर, महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, आदींनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.संगीत व कला अकादमीच्या चमूने उत्कृष्ट गीते सादर केल्याबद्दल राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी 25 हजार रूपयांची भेट जाहीर केली.

Post a comment

 
Top