0
BY –  युवा महाराष्ट्र लाइव –  ठाणे  |
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज सरकारी शिवजयंती ! इथे तिथिनुसारही साजरी केली जाते, पण मी म्हणतो महाराजांचा दररोज जन्मदिवस असला तरी आमची तयारी आहे रोज शिवजयंती साजरी करण्याची !कारण महाराज हे आमचे राजेच नसून या संबंध महाराष्ट्राचे दैवत आहेत, हरेक व्यक्तीचा श्वास आहे, आत्मविश्वास आहे, सळसळणारे रक्त आहे. हे बोल आहेत, राजे प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात छोटेखाणी भाषण करणाऱ्या गुरुराज शेळके याचे. आज शिवजयंती निमित्त ठाण्यातील खारेगाव येथे समृद्धी हाईट्स या सोसायटीत शिवजयंती साजरी मोठ्या उत्साहात पार पडली. या उत्सवाला महिला आणि लहान बालकांनी उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनी महाराजांचे महत्व बालकांना पटवून दिले. तर बालकांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले,
        याशिवाय काळाची गरज अोळखून मुलींना व महिलांना स्वत:च स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी या कार्यक्रमात लाठीकाठीचे, स्वसंरक्षनाचे प्रशिक्षण सुप्रसिद्ध मार्शल आर्ट   मास्टर  गजेंद्र शर्मा यांनी दिले.
         एक दिवस शिवजयंती साजरी करून महाराजांचे  विचार पोचणार नाहीत. मुलांवर शिवकालीन संस्कार झाले पाहिजे यासाठी दर शनिवारी मुलांसाठी बालसंस्कार वर्ग सुरु करत आहोत. योग प्रशिक्षण वर्ग सुरु करत आहोत, आम्हाला साथ द्या, तरुनांनी संस्थेत सामील व्हा, असे आवाहन शेवटी आपल्या भाषणात संस्थेचे अध्यक्ष प्रा. संभाजी शेळके यांनी केले.या कार्यक्रमात वर्षभर संस्थेसाठी तन ,मन, आणि धन आर्पण करुन कार्यरत असणारे राजेंद्र काकडे , गजेंद्र शर्मा , महेंद्र माने यांना शिवप्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले !


Post a comment

 
Top