web-ads-yml-728x90

Breaking News

खापरी युवा मंचने जागवला शिवरायांचा विचार

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

मुक्काम खापरी तालुका मुरबाड या गावाच्या इतिहासात काल पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. आपापसातील वाद ,भांडण-तंटे, कुरघोडी, राजकारण यासाठी प्रसिद्ध असलेल्या खापरी गावातील युवापिढीने छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरणा घेऊन गावाला लागलेला हा कलंक पुसण्याची प्रेरणा घेऊन यावर्षी सर्व जाती धर्माचे तरुण वर्ग, महिला भगिनी, यांना एकत्र करून सार्वजनिक शिवजयंती उत्सव गावातील समाज हॉल मध्ये साजरा करण्यात आला .शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, 
गावातील सर्व रस्ते स्वच्छ साफ करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या महिला भगिनींनी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, तसेच वकृत्व स्पर्धा भरवण्यात आल्या. छत्रपती शिवरायांची पालखी गावातील सर्व रस्त्याने संपूर्ण गावात काढण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांप्रती भाषणे, पोवाडे ,गीते सादर करण्यात आली ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या माणसांना एकत्र करून या स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रमाणे या खापरी गावातील युवा वर्गाने सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून एका विचाराने प्रेरित होऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे एकत्र राहून कार्य करण्याच्या प्रेरणेने ही शिवजयंती साजरी करण्यात आली .यासाठी खापरी युवा मंच चे रमेश नथु राऊत व युवा वर्गातील त्यांचे सर्व सहकारी, महिला भगिनी यांनी एक धाडसी पाऊल उचलल्याचे दिसून येते या सर्व कार्यासाठी खापरी युवा मंचला खापरी गावातील पोलीस अधिकारी श्री विनायक गोल्हे साहेब , शिक्षक श्री शिवाजी राऊत सर, श्री सोपान गोल्हे सर, दिलीप शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभल्याचे दिसून येते. शिवरायांच्या प्रेरणेने ही सुरुवात झाली असून येत्या काळात खापरी गावाचा सर्वांगीण विकास ,शैक्षणिक विकास तसेच इतर सार्वजनिक हिताच्या गोष्टी या युवा मंचाच्या मार्फतीने नक्कीच केल्या जातील असे सांगण्यात आले.

No comments