web-ads-yml-750x100

Breaking News

पूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्य पोलीस दलाच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' मध्ये पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने तर महिलांमध्ये ज्योती गवते यांनी पहिला क्रमांक मिळविला.वांद्रे-वरळी सी-लिंक येथे पहाटे 5.40 वाजता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झेंडा दाखविल्यानंतर मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करून 'तंदुरुस्त भारत-फिट इंडिया'चा संदेश कृतीतून दिल्याबद्दल गृहमंत्र्यांनी राज्य पोलीस दलाचे कौतुक केले. यावेळी क्रीडामंत्री सुनिल केदार, प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला. यावेळी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, बृहृमुंबईचे सह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, प्रसिद्ध अभिनेते अक्षयकुमार, रोहित शेट्टी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

No comments