web-ads-yml-750x100

Breaking News

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील “ भाल ” या विभागातील जनतेला डंपिंग आरक्षणातून दिलासा देणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही.....

BY – मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे  |
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील भाल या गावी क्षपणभूमीचे आरक्षण टाकण्यात आले असून स्थानिकांचा याला विरोध आहे. क्षपणभूमीसह विविध प्रकारच्या आरक्षणामुळे भाल गावात मोकळी जमीनच उपलब्ध राहात नसून याप्रकरणी निश्चितपणे भालच्या ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय घेऊ, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकी दरम्यान दिली. “ विकेंद्रीत पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प उभारणे आवश्यक असून अख्खे गाव बाधित होत असेल तर तो ग्रामस्थांवर अन्याय होईल. निसर्गरम्य असे हे गाव असून गावात ८ एकरावर पसरलेला तलाव देखील आहे. त्यामुळे यासंदर्भात निश्चितपणे ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेतला जाईल असे प्रतिपादन यासमयी केले.
     याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, जगन्नाथ शिंदे, माजी आमदार सुभाष भोईर, नगरविकास (२) विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त गोविंदराज, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि भाल गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

        

No comments