0
BY – युवा महाराष्ट्र लाइव –  नवी दिल्ली |
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात होणाऱ्या करारांतून दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सामरिक संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच, व्यापारातील शुल्क व असमतोलाच्या मुद्द्यांवर तोडगा निघणार का याची उत्सुकताही सर्वांना आहे.डोनाल्ड ट्रम्प आज भारतात येतील. स्थानिक वेळेनुसार ते रविवार रात्री सव्वा आठ वाजता वॉशिंग्टनहून रवाना झाले आहेत. भारताच्या दौऱ्यावर येत असलेले ते अमेरिकेचे सातवे राष्‍ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्‍ड ट्रंप दोन दिवसांमधील 36 तास भारतामध्ये घालवणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते अत्यंत व्यस्त असतील. महत्त्वाचे म्हणजे डोनाल्‍ड ट्रंप यांच्यासोबत पत्‍नी मेलानिया ट्रम्प, कन्या इवांका ट्रम्प आणि जावई देखील हजेरी लावणार आहेत. यासोबतच एक उच्‍चस्‍तरीय शिष्टमंडळ भारतात येणार आहे.

Post a comment

 
Top