0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |

पूल प्रल्हादपूर भागात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमसोबत पहाटे चकमक झाली. यावेळी दोन गुन्हेगारांना यमदसनी धाडण्यात पोलिसांना यश आले. राजा कुरेशी आणि रमेश बहादूर अशी या दोन गुन्हेगारांची नावे आहेत. दिल्लीतील अनेक पोलीस स्टेशनमध्ये या दोघांवर विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच नुकत्याच घडलेल्या कारवाल नगरमधील खूनाच्या गुन्ह्यातही त्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती.

Post a comment

 
Top