web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह

BY – युवा महाराष्ट्र लाइव – पैठण  |
महाराष्ट्रातील दक्षिण काशी तिर्थक्षेत्र पैठण नगरीत भगवान शिवशंकराची जवळपास वीस प्राचीन शिवालये असल्यामुळे या पैठण नगरीत  दर्शनासाठी महाशिवराञीच्या परंपरेनुसार महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शिवभक्त दि. 21 शुक्रवार रोजी महाशिवराञीच्या पर्वावर मोठ्या संख्येने लोटले होते. पहाटेपासूनच गोदावरीत स्नान करून हर हर महादेव चा गजर करीत भक्तगण शहरात विखुरलेल्या शिवालयातील शिवपिंडींच्या दर्शनासाठी लोटत होते.
      पुरोहितांच्या मंञघोषात महाभिषेक भक्तगणांकडून मध्यराञीपर्यंत चालू होते. शहरात पिंपळेश्वर महादेव (दक्षिण काशी मैदान, गोदाकाठ), गाढेश्वर महादेव (कावसानकर क्रीडांगण), दोलेश्वर महादेव (आठवडी बाजार मैदान), तारणहार चक्रेश्वर महादेव (तेली धर्मशाळा, संतनगर), सोमेश्वर महादेव (परदेशीपूरा), गोदेश्वर महादेव (जैनपूरा), गंगेश्वर महादेव (गागाभट चौक), रामेश्वर महादेव (नाथगल्ली कमान), भुयारेश्वर महादेव (जुना भगवानबाबा मठ), तारकेश्वर महादेव (गणेशघाट), हरहरेश्वर महादेव (तारगल्ली रोड), अमृतेश्वर महादेव (मामाचौक), कालिकैश्वर महादेव (रंगारहाटी घाट), इंद्रेश्वर महादेव (नागघाट), नागेश्वर महादेव (नागघाट), प्रयागेश्वर महादेव (प्रयागतिर्थ, महानुभाव मंदिरामागील गोदापाञ), बाळलिंगेश्वर महादेव (नवनाथ मंदिर गुंफेसमोर), सिद्धेश्वर महादेव (सिद्धेश्वर घाट), जिव्हेश्वर महादेव (साळीवाडा), चंद्रेश्वर महादेव (इंदिरानगर), तसेच  वडवानेश्वर महादेव (वडवाळी) अशाप्रकारे शहरभर ठिकठिकाणी शिवालये विखुरलेली आहेत.
      संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणच्या धर्मन्यायपीठाकडून शुद्धिपत्र मिळविल्यानंतर भावंडांसह सिद्धेश्वर तिर्थावलीवरील घाटावर दोन वर्षे आठ महिने वास्तव्य केले होते. या वास्तव्या दरम्यान पहिला महाशिवराञी उत्सव संत ज्ञानेश्वर महाराज व भावंडांनी भक्तीमय वातावरणात प्रवचने, किर्तने तसेच अध्यात्मिक ग्रंथ लिहून साजरा केला. त्या बाराव्या शतकापासून अखंडपणे प्रत्येक वर्षी महाशिवराञी निमित्ताने सिद्धेश्वर तिर्थावलीवर नियमित याञा भरते. यंदाचे याञा भरणारे हे 733 वे वर्ष आहे.


No comments