0
BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
अवैध बांधकामाना पाठिशी घालुन प्रशासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष करून अवैध बांधकाम कर आकारणी करणार्‍या मुरबाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी परितोष कंकाल यांना शासनाने तात्काळ निलंबित करावे अशी मांगणी सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.मुरबाड नगरपंचायतीच्या अंतर्गत येणार्‍या शहरातील अनेक अवैध बांधकामे महसुल विभागाने अनाधिकृत ठरवून मुख्याधिकार्‍यांना कारवार्इचे आदेश दिले आहेत.त्याकडे दुर्लक्ष करून सरकारी जागेत अवैध बांधकाम केली आहेत.त्यांची करआकारणी करून अवैध बांधकामाची विक्री विक्री केलेल्या गाल्यांवर कारवार्इस टाळाटाळ करणार्‍या मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी खतला दाखल करून कारवार्इ करावी कर आकारणी रद्द करावी शहरातील निकृष्ट कामाची बिले काढली आहेत शहरातील अनेक नागरिकाना पाणीपट्टी घरपट्टी अवैध बिले दिले आहेत अपंगाचा निधी हाडप केला आहे. शासनाच्या योजनाचा निधी मनमानी खर्च केला आहे.या सार्‍यांची चौकशी करून परितोष कंकाल यांच्यावर तात्काळ निलंबिताची कारवार्इ करावी अशी मांगणी जेष्ठ पत्रकार तथा समाजसेवक नामदेव शेलार यांनी केली आहे. ज्या अवैध बांधकामाचा ठपका ठेवुन तात्कालीन मुख्याधिकारी पंकज भुसे यांना निलंबित केले आहे.त्याचा गैरमनमानी अवैध बांधकामाना परितोष कंकाल यांनी पाठिशी घातले आहे.

Post a comment

 
Top