0
BY – युवा महाराष्ट्र लाइव –  बंगळुरु |
गँगस्टर रवी पुजारीला रविवारी रात्री उशिरा भारतात आणण्यात (Ravi Pujari Brought To India) आलं. सीबीआयची टीम रवी पुजारीला घेऊन भारतात पोहोचली. गँगस्टर रवी पुजारी याला कर्नाटक येथील एका गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. रवी पुजारी हा भारताचा वॉन्टेड आरोपी आहे. त्याच्या विरोधात मुंबई, कर्नाटकसह अनेक राज्यात जवळपास 200 गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारी हा दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी सीबीआयच्या आणि रॉमार्फत दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांना रवी पुजारी याला अटक करण्यास भाग पाडलं. गेल्या काही महिन्यांपासून तो दक्षिण आफ्रिकेच्या जेल मध्ये होता. यानंतर अखेर त्याला भारतात आणण्यात आलं. कर्नाटक पोलिसांच्या (Ravi Pujari Brought To India) वॉरंटवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top