0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – सोलापूर  |
सोलापूर मार्गावरील राळेरास ते शेळगाव रस्त्यावर क्रूझर जीप आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. मयत सर्व बार्शी पंचायत समितीचे कर्मचारी होते. बार्शीहून सोलापूरकडे महिला बचत गटांच्या कार्यक्रमासाठी जातं असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. समोरासमोर झालेल्या या अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की अपघातात क्रुझर गाडीचा चक्काचूर झाला. त्यात बसलेले चार जण जागीच ठार झाले आहेत. तर एका जणाचा उचारासाठी घेऊन जात असताना मृत्यु झाला.

Post a comment

 
Top