0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर  |
अहमदनगर सिद्धार्थ नगर येथील साहीत्य सम्राट आण्णाभाऊ साठे चौकातील महापुरुष महागुरु आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार सुमने अर्पण करुन त्यांच्या  नावाचा जयघोष करण्यात आला.जय लहुजी...आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो...तसेच भारत भुमीच्या समस्त महापुरुषांच्याही नावाच्या घोषनांनी संपुर्ण परीसर दुमदुमून गेला लहुजींच्या उच्च लढाऊ विचारांचा व अमुल्य कार्याचा उजाळा दिला उपस्थीत लहुसैनीकांनी आपआपले मौलीक विचार भाषणामधुन मांडले.सुनिल सकट व साहेबराव काते यांनी मातंग समाजास एकीच्या बळाचे महत्व पटवुन दिले."व्यायाम करा बलदंड व्हा,देश सशक्त करा". शिक्षणात प्रभुत्व निर्माण करा असा मोलाचा सल्ला दिला.त्या समयी सागर साळवे, आकाश साबळे, कांतीलाल उल्हारे,  अमोल पवार, विकास शिंदे, आकाश लोखंडे यांनी उपस्थीत राहुन पुणे येथील क्रांती भुमी संगमवाडी लहुजींच्या पवीत्र समाधीस्थळाचे सर्व लहुसैनीकांनी दर्शन घ्यावे असे समाजास  आवाहन केले.

Post a comment

 
Top