web-ads-yml-728x90

Breaking News

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या तीन महिन्यांत ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरू आहे, त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करूनच पुढे जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील गिरणी कामगारांच्या सक्रिय सहभागामुळेच मुंबईसह महाराष्ट्र मिळाले आहे. गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरे मुंबईतच मिळावी यासाठी शासन सकारात्मक आहे. कामगारांच्या 3835 घरांसाठी एक मार्च रोजी लॉटरी काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.‍ गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस माजी मंत्री सचिन अहिर यांनी गिरणी कामगारांचे प्रतिनिधित्व केले.

No comments