0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा. तसेच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली.मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या 15, सफदरजंग लेन या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि खासदार हेमंत पाटील उपस्थित होते.

Post a comment

 
Top