0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई अंतर्गत विभाग समिती क्र. ५ वतीने रविवार दि. ९ फेब्रुवारी, २०२० रोजी स. १० वा. संत रोहिदास चौक, प्रभादेवी येथे "संत शिरोमणी संत रोहिदास जयंती" उत्सव साजरा करण्यात आला.सदर उत्सवप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजाचे अध्यक्ष मा.श्री. मयुर देवळेकर, सचिव श्री. रवि पेवेकर नगरसेवक मा. श्री. समाधान सरवणकर, नगरसेविका मा.सौ. स्नेहल सूर्यकांत आंबेकर, संघ विश्वस्त सर्वश्री मा.श्री. दिपक आडीवरेकर, संतोष गोठणकर, शशिकांत आंबेकर, पांडुरंग कदम, सौ. अश्विनी प्रभुलकर, सौ. सपना बसनकर व श्री विजय गोवळकर - उपाध्यक्ष, भाजपा, मुंबई हे उपस्थित होते.
सदर सोहळ्यानिमित्त त्याच दिवशी सायंकाळी ६ नंतर जनतेसाठी गोड पदार्थ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. सदर सोहळा यशस्वी करणेसाठी सर्वश्री नारायण तिवरेकर, गोविंद देवरुखकर, गणेश भेलसेकर, मनोज सावर्डेकर, संतोष पेवेकर, सचिन चव्हाण, सौ. मालती कोंडविलकर, सौ. रेश्मा शिर्के, सौ. साधना भेलसेकर यांनी विशेष मेहनत घेतली.सोहळ्याप्रसंगी विविध विभागाचे मान्यवर पदाधिकारी आवर्जुन उपस्थित होते.

Post a comment

 
Top