BY -
नामदेव शेलार,युवा
महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
गेल्या काही महिण्यांपासून मुरबाड
तालुक्यात गुटखा विक्री सत्र जोमाने चालू असताना मुरबाड पोलिसांना ते दिसून आले नाही.गुटखा
डिलर हा युवकांच्या जिवनाचा किलर बनला असून त्या गुटखा डिलरवर आजपर्यंत पकड बसविण्यात
आली नव्हती.गुटखा विक्री संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असताना छुप्या पध्दतीने गुटखा डिलर गुटख्याची विक्री जोमाने
करित असलाने गुटखा विक्रीवर '' स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र व युवा महाराष्ट्र लार्इव्ह
वृत्तवाहिनीने '' लेखणी चालून करून प्रशासनास सदरचा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणून दिले.वारंवार बातम्या येत असताना
मुरबाड पोलिसांनी याकडे गांभिर्यतेने लक्ष वेधले नाही अखेर आमच्या बातमीची दखल अन्न
व औषध विभागाने घेऊन मुरबाड तालुक्यात सापळा रचत गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणार्याचा छडा लावला.अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांनी आपल्या पथकासह गुटखा
विक्री करणार्यावर छापा टाकला.या छाप्यात त्यांच्याकडून 11 हजारांचा मुद्देमाल आढळून
आला.त्या मुद्देमाला हस्तगत करून त्या गुटखा विक्री करणार्या चौघांना ताब्यात घेऊन
त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना अटक करून मुरबाड पोलिसांकडे त्या चौघांना
सुपुर्त करण्यात आले.या ठिकाणी मुरबाड तालुक्यातच नव्हे तर मुरबाड शहरात मोठया प्रमाणात
गुटखा,मटका,जुगार असे अवैध धंदे होत असताना मुरबाड पोलिसांना का नाही दिसत.नेहमी तक्रार
करणे महत्वाचे आहे काय ? मग आपली कामे कोणती असा सवाल नागरिकांनी केला आहे.
अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांना ही अवैध
गंभिर बाब लक्षात आली परंतू मुरबाड पोलिसांना ही बाब का लक्ष आली नाही असा प्रश्न
मात्र उपस्थित होत आहे.गुटखा डिलरचा मुख्य व्यक्ती आजही मोकाटच आहे.त्या चौघांकडे अखेर
तो मुद्देमाल आला कुठून ? कोणी दिला ? यामागील मुख्य गुटखा विक्री करणारा अद्दयाप जेरबंद
का नाही ? काल पर्यंत दुकानावर गुटखा होता
आता छुप्या पध्दतीने गुटखा मिळत असूनही चोकशी
का केली जात नाही.गुटखा डिल याच्या मागे कोणत्या राजकीय नेत्याचा पाठबळ तर नाही ना
असा सवाल संशयित निर्माण होत आहे.मुख्य गुटखा डिलर अजूनही मोकाटच आहे.त्यावर पकड केव्हा
बसेल याच्या प्रतिक्षेत सर्व जनता आहे.गुटखा डिलर किलर बनला असून राजरोस पणे गुटखा
विक्रीचा धंदा थाटून मोठया प्रमाणात हप्तेबाजी
करत असून त्या हप्तेबाजी घेणार्यावरही लाचलूचपत प्रतिबंधक विभाग कारवार्इ करेल याच
प्रतिक्षेत आता जनता आहे.हप्तेबाजी घेणार्यांला थोडं बिचकून राहावे लागेल कारण कदाचित
पुढिल छापा गुटखा डिलरवर नसून गुटखा विक्रीचा हप्ता घेण्यावर पडेल.
अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक
भरत वसावे यांनी मुरबाड तालुक्यातील बेकायदेशीर गुटखा विक्री करणार्यांना अटक करून
दाखवून दिले आहे कि प्रशासक अजूनही ज्वलंत आहे आणि पत्रकारांच्या लेखणीला जागृत ठेऊन
त्या वृत्तांची दखल घेतली जाते. अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांच्या
निर्भिड कार्याची पोहोच पावती त्यांच्या टाकलेल्या गुटखा विक्रेत्यांवर छापा टाकत अटक
केली यातून दिसून आली.परंतू आजही त्यांना मुद्देमाल देणारा गुटखा डिलर मोकाटच आहे त्याच्यावरही
आपली पकड होऊन त्यालाही अटक करावी जेणे करून युवकांचे फुफ्फुसे खराब होऊन कोणताही व्यक्ती
मृत्युच्या सावक्यात जाऊ शकणार नाही.मुरबाडमध्ये असेच 5 ते 6 गुटखा डिलर असून त्यांचा
मुख्य सुत्रधार हा एका राजकीय पुढार्याचा मित्र,भाऊ,नातेवार्इक असू शकतो अशी शंका
नाकारता येणार नाही.
Post a comment