0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासन अनेक स्तरांवर उपाययोजना करीत असून याचाच एक भाग म्हणून राज्य महिला आयोगाचे कार्यालय आता विभागीय स्तरावर स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला-बाल भवन उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेतून एक कोटी रूपयांची तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवनात झालेल्या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, महिला व बाल विकास सचिव आय. ए. कुंदन, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top