BY – युवा महाराष्ट्र
लाइव – भिवंडी |
गाव म्हंटल की गावातस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान, व्यसनमुक्ती
जनजागृती,साक्षरता अभियान असे अनेक उपक्रम सरकारच्या प्रेरणेने गावातील ग्रामपंचायतीच्या
किंवा स्थानिक मंडळांच्या पुढाकाराने राबविले जातात, यासाठी गावातील पुढाऱ्यांना किंवा
समाजसेवकांना गावाच्या विकासाचा ध्यास असेल तर ते गावं नक्कीच प्रगत होते. असच एक भिवंडी तालुक्यातील
वेहेळे गाव.!येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच माननीय श्रीमती अनिताताई सोन्या पाटील तसेच
शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय श्री.विलास भाऊ पाटील, यांच्या प्रयत्नांनी गावात
अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून
नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम
राबवणारी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारी जिल्हा परिषद केंद्रशाळा
वेहेळे, शाळा व्यवस्थापन समिती व "वरियर फाऊंडेशन"मुंबई यांच्या संयुक्त
विद्यमाने आरोग्यम् धनसंपदा या उक्तीप्रमाणे भावी पिढीला जर शारीरिक दृष्ट्या सुदृढ
करून त्यांची मनशक्ती वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले
तर ते स्वतःच्या व भारताच्या उत्तम प्रगतीकडे सशक्त वाटचाल करू शकतील हा विशाल दृष्टिकोन
समोर ठेऊन"मोफत आरोग्य तपासणी शिबीर"रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२० रोजी
जिल्हा परिषद केंद्रशाळा वेहेळे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.सदर आरोग्य तपासणी
शिबिराचे उद्घाटन वरियर फाऊंडेशनचे ज्येष्ठ सर्वेसर्वा माननीय श्री.माधवन व ग्रामपंचायत
वेहेळेच्या सन्माननीय सरपंच सौ.अनिता ताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले,नेत्र
चिकित्सा, दंत चिकित्सा व जनरल फिजिशियन तसेच रक्त तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या
या आरोग्य शिबिरात करण्यात आल्या. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या आवश्यक त्या तपासण्यांनंतर
त्यांना योग्य तो औषधोपचार मोफत करण्यात आला. नेत्रदोष आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना
वरियर फाऊंडेशनतर्फे मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत, दंत तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांना
दातांची निगा कशी राखावी दात कसे स्वच्छ ठेवावेत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले यासाठी
तज्ञ डॉ.विजय काबरे, डॉ.सुनीता छेडा, डॉ.श्रुतिका सूर्यवंशी, डॉ.मधुपा पाटील, डॉ.महेश
पाटील, डॉ.अश्विनी कुडूपुडी, डॉ.अंकित जैन, डॉ.रूपाली, डॉ.निर्मला शहा, डॉ.हजारे, डॉ.देवळे,
डॉ.सोनल जैन, डॉ.ज्योती तिवारी यांच्यासह त्यांना मदत करणारे सौ.विजयलक्ष्मी, सौ.विनिता, श्री.विजय वरीअर, श्री.विजय
सूर्यवंशी, श्री.राम मोहन, प्रमोदिनी भोयर या सर्व टीम ने विनामूल्य योगदान दिले. शिबिराला
ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. गावातील ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक यांचेसह शाळेतील
३८७ विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला त्याप्रसंगी शिवसेना भिवंडी तालुकाप्रमुख व
वेहेळे गावचे सुपुत्र सन्माननीय श्री.विश्वासजी थळे साहेब व पंचायत समिती सदस्या सन्माननीय
सौ.विद्याताई थळे यांनी सदिच्छा भेट देऊन प्रोत्साहन दिले.शिबिर यशस्वी करण्यासाठी
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री.विलास पाटील यांचेसह सर्व शालेय समिती
सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, वेहेळे पी.एच.सी.आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस
तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निकवाडे मॅडम, सौ.चंचला पाटील, सौ.नमिता
पाटील, सौ.जयश्री ढाके, सौ.विजयलक्ष्मी सूर्यवंशी, सौ.माधुरी पाटील, सौ.संजना पाटील,
सौ.छाया जाधव, श्री.राजेंद्र सातपुते व सौ.स्नेहल तारी या शिक्षकांनी उत्तम नियोजन
करून विशेष सहकार्य केले.
Post a comment