0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पनवेल |
पनवेल तालुक्यातील टेंभोडे गावाजवळ अनुसुचित जातीतील पिडीत व्यक्ती राकेश हरकुळकर यांचेवर पुर्व वैमन्यस्यातून दोनदा प्राणघातक हल्ला झाला. परंतु खांदेश्वर पोलीस ठाण्यात सदर गुन्हा अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत नोंदवुन न घेता आरोपींना वाचवण्यासाठी जाणिवपुर्वक भादवि.संहितेचे कलम 326, अंतर्गत नोंदवुन कमी शिक्षा असलेले कलम लावण्यात आल्याने तसेच इतर 6/7 आरोपींसह मुख्य आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासनाने दिरंगाई करुन गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके व संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित. यांनी मुख्यमंत्री उद्ववजी ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
सदर गुन्ह्यात आपल्या पदाचा व हुद्द्याचा गैरवापर करून जाणीवपूर्वक आरोपींचा बचाव करणारे पोलीस उपनिरीक्षक सावंत व गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल रविंद्र गिड्डे यांना सदर गुन्ह्यात सह आरोपी करावे व त्यांच्यावर अनुसूचित जाती अनु.जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारीत अधिनियम 2015 चे कलम चार अंतर्गत कारवाई करुन सदर गुन्ह्याचा तपास उच्च स्तरीय यंत्रणेच्या सक्षम अधिका-यांमार्फत करणेत यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात चुकीची कलमे लावून इतर फरार आरोपींना वाचवण्यासाठी तपास अधिकारी रविंद्र गिड्डे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फिर्यादी बद्दल खोटी, चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देवुन अनुसुचित जातीतील पिडीत व्यक्तीचा दुःस्वास करीत आहेत. सदर पिडीताचाच नव्हे तर ते अॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप करुन अनुसुचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याबाबत गैरसमज पसरवण्याचे दुःकर्म करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण समाजात सदर पोलिस अधिका-याबद्दल चिड निर्माण झालेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींनी पिडीतावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केलेला असुन वारंवार मागणी करूनही गुन्ह्यात भादवि.संहितेचे कलम 307 समाविष्ट न केल्याने व जातीद्वेषभावनेने पछाडलेले तपास अधिकारी पक्षपातीपणे गुन्ह्याचा तपास करीत असलेने सबंधित पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी व गुन्ह्यांमध्ये कलम 307 चा समावेश करावा या व इतर मागण्या मान्य न झाल्यास दि. 24 फेब्रुवारी 2020. पासुन सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल यांच्या कार्यालयासमोर अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे राज्य सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित. यांचे नेतृत्वाखाली पिडीत कुटुंबासह इतर समविचारी संस्था संघटनांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांनी दिला आहे.

Post a comment

 
Top