web-ads-yml-750x100

Breaking News

जिजाऊ गौरव पुरस्कार नियोजन समितीची बैठक संपन्न

BY – युवा महाराष्ट्र लाइव – टीटवाळा |
डॉ.निता फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार नियोजन समितीची बैठक (गुरुवार दि.०६/०२/२०२०) रोजी सायंकाळी ४ : ३० वाजता शिवश्री प्रभाकर भोईर यांच्या समिक्षा एंटरप्रायझेस या कार्यालयात फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.निता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.बैठकीत स्वागत,नाव नोंदणी,प्रमुख पाहुण्यांची व्यवस्था,सभागृह व्यवस्थापन,ट्रॉफी,प्रमाणपत्र व्यवस्थापन,सुत्रसंचालन,निरिक्षण या व इतर जबाबदा-या कोणी व कशा पार पाडाव्यात या संदर्भात डॉ.अमितकुमार गोविलकर व डॉ.निता पाटील यांनी मार्गदर्शक सुचना केल्या.बैठकीत इतर कार्यकारिणी सदस्यांच्या सुचनांचाही विचार करुन कार्यक्रमाअंतर्गत त्या अमलात आणण्याचा सांगोपाग विचार झाला.सर्वांनी मिळुन 8फेब्रुवारी रोजी महिला मंडळ हॉल,अत्रे मंदिराच्या बाजुला, कल्याण(प) येथे होणारा डॉ.निता पाटील फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळा गौरवांकीत व यशस्वी करणारच या उद्देशाने उर्वरित वेळेत काम करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन बैठकीची सांगता झाली.  

No comments